ज्यांचा स्वभाव चांगला असतो, ते नेहमी माणसांच्या घोळक्यात असतात.
पण माझ्याशी कोणीच बोलत नाही, माझ्याजवळ कोणी येत नाही, अशी तक्रार अनेकजण करताना आपण पाहिली असेल.
तुमच्यापासून लोकं दूर पळत असतील, बोलायच टाळत असतील तर समजून जा तुमची सवय त्याला कारणीभूत आहे.
तुम्ही दुसऱ्यांच्या चुका दाखवून स्वत:ला सर्वगुण संपन्न दाखवत असाल तर ही सवय इतरांना तुमच्यापासून दूर ठेवते.
तुम्हाला नेहमी स्वत:ची स्तुती सांगण्याची सवय असेल तर लोकांना तुम्ही आवडणार नाही.
तुम्ही सोशलाइज नसाल आणि तुमच्यात इगो असेल तरी लोक तुम्हाला दूर ठेवतील.
तुम्ही खोटं बोलता आणि कारस्थानी असाल तरी लोक तुमच्यापासून दूर पळतील.
तुम्हाला पाठीमागून बोलायची सवय असेल किंवा इतरांचे क्रेडीट घेण्याची सवय असेल तरी लोकं तुम्हाला टाळतील.
तुम्ही लोकांच्या चांगल्याचा विनाकारण मत्सर, द्वेश करत असाल तर लोक तुमच्या जवळ राहणार नाहीत.