नारळाच्या तेलात लिंबाचा रस घालून केसांना लावल्यास केसांवर चमक येऊन केस वाढू लागतात.
कांद्याला मिक्सरमध्ये बारिक वाटून त्याचा रस काढून घ्या. हा रस केसांना लावून मालिश करा त्यानंतर केस स्वच्छ धुवून टाका.
मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवून केसांना लावा.
बटाटा व्हिटामीन A,B आणि C नं भरपूर असतं. याचा रस केसांना लावून थोडा वेळानं धुवा.
आठवड्यातून 1-2 वेळा एरंडेल तेलानं केसांना मसाज करा त्यामुळे केसांना पुरेसे पोषण मिळते.
आठवड्यातून एकदा केसांना मेंदी लावण्यानं केस मऊ होऊ लागतात.
मोहरी, तीळ, नारळ आणि एरंडेल तेल एकत्र करून केसांना मालिश करावे. ( Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )