चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा लागतोच, हे वाक्य तर तुम्हाला माहितीये.
प्रवासात असतानाही काहींना चहा प्यावासा वाटतो. याचसाठी आज आम्ही तुम्हाला Instant Tea Premixची रेसिपी सांगणार आहोत
सर्वप्रथम एका भांड्यात दालचिनी, मिरी, लवंग आणि सुंठ पाच ते मिनिटे परतवून घ्या.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य टाका. व 2 टेबलस्पून वेलचीपूड आणि 1/4 चहाची पावडर टाका.
तीन ते चार कप साखर आणि 1/2 कप मिल्क पावडर टाकून सर्व मिश्रण बारीक करुन घ्या
त्यानंतर तुमचे चहाचे प्रीमिक्स तयार आहे. हे हवाबंद डब्यात बंद करुन ठेवल्यास 2-3 महिने टिकते
जेव्हा गरज असेल तेव्हा फक्त गरम पाण्यात एक चमचा हे प्रीमिक्स टाका घरचा चहा तयार होईल.