बदलती जीवनशैली आणि आहारामुळे महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या दिसून येतात.
जर तुम्हालाही अनियमित मासिक पाळीचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा.
आहारात ओव्याच्या पानांचा समावेश करावा. पानं पाण्यात भिजवून त्याचे पाणी प्यावे यामुळे समस्यांवर आराम मिळू शकतो.
दालचिनीचे पाणी अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून आराम देऊ शकते.
पपई उष्ण समजली जात असली तरी तिचं सेवन करण हे अनियमित मासिक पाळीवरील उपचार म्हणून फायद्याचे ठरते.
काळ्या मनुक्यांचा आहारात समावेश करा, यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते.
ब्रोकोली आणि फ्लॉवरदेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)