चेहऱ्यावरुन फिरवा आइस क्युब आणि मिळवा आश्चर्यजनक फायदे

रोज सकाळी चेहऱ्यावर आइस क्युबने मसाज केल्यास रक्त प्रवाह सुरळीत होतो तसंच, चेहऱ्यावर तेजही येते

Mansi kshirsagar
Apr 22,2024


बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावरील रोमछिद्र खुली होतात आणि अतिरिक्त तेल निघून जाते. त्यामुळं पिंपल्सदेखील निघून जातात.


चेहऱ्यावर सूज आली असेल किंवा डोळ्याखाली फुगवटा जाणवत असेल तर बर्फाने मसाज करणे फायद्याचे ठरते


जास्त वेळ कम्पुटंर स्क्रीनकडे बघितल्यास डोळ्यांवर थकवा येतो. अशा परिस्थितीत डोळ्यांच्या आसपास बर्फ फिरवल्याने आराम मिळतो


नियमितपणे बर्फ फिरवल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.


टॅनिंग किंवा सनबर्न झाल्यास बर्फाने मसाज केल्यास जळजळ व लाल चट्टे कमी होतात.


मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास रोमछिद्रे बंद होतात आणि मेकअप जास्त काळ टिकतो


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story