आंबट गोड कैरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.
आज आपण कैरीचे सार म्हणजेच कढी कशी करायची, याची रेसिपी जाणून घेऊया
कच्च्या कैरीचे सार बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात कैरी व पाणी घालून पूर्णपणे शिजवून घ्या
एका कढाईत तेल गरम करुन जिरे, मोहरी, हिंग घेऊन परतून घ्या
जिरे, मोहरी तडतडल्यानंतर त्यात कढिपत्ता, लसूण आणि लाल मिरच्या टाका
या फोडणीत आता शिजवून घेतलेला कैरीचा पल्प टाका
आता यात नारळाचे दूध, गूळ आणि मीठ टाकून मंद आचेवर 4-5 मिनिटे शिजवा
गरम गरम भाताबरोबर कैरीचे सार खूप छान लागते.