धार्मिकदृष्ट्या कापराला जसं महत्त्व आहे तसंच आयुर्वेदातही कापराला महत्त्व दिलं जातं. त्वचेसाठी कापूर उपयुक्त मानला जातो.
कापूर नारळाच्या तेलात एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा दाह कमी होतो.
तेलकट त्वचेसाठी कापूर फायदेशीर ठरतो. स्क्रब ऐवजी कापराने चेहऱ्याला मसाज केल्याने पिंपल्स् दूर होतात.
भाजलेल्या त्वचेला कापराच्या तेलाने मसाज केल्यास त्वचेवरील डाग दूर होतात.
पायांना भेगा पडल्या असतील तर कोमट पाण्यात कापूर मिसळा. काही वेळ त्यात पाय बुडवून ठेवा. असं केल्यास पायाची त्वचा नरम पडते.
फेसपॅकमध्ये कापूर मिसळल्यास त्वचा सुधारते.
आठवड्यातून दोनदा कापराने चेहऱ्याला मसाज केल्यास सन टॅनिंगची समस्या दूर होते.
दुधात कापूर मिसळून चेहऱ्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते.