किचनमध्ये रोजच्या वापरात येणारी भांडी म्हणजे तवा, कढाई आणि पातेले. थोड्यावेळाने ती भांडी काळी पडत जातात.
काळे पडलेले भांडे आणि करपलेला तवा कितीही साफ केला तरी स्वच्छ होत नाही. अशावेळी तुम्ही घरातच एक पावडर बनवून लख्खं स्वच्छ करु शकता.
तीन चमचे कास्टिक सोडा, दोन चमचे सिट्रिक अॅसिड, स्टील स्क्रबर, डिटर्जेंट पावडर
सुरुवातीला एक बॉटल घ्या. लक्षात असूद्याकी ही बॉटल पूर्णपणे सुकवून घ्या. त्यानंतर यात सर्व साहित्य मिक्स करुन घ्या
जेव्हा भांडी घासण्यासाठी तुम्ही या पावडरचा वापर कराल तेव्हा एका वाटीत जेवढी गरज आहे तितकीच पावडर काढून घ्या. त्यानंतर बॉटल पुन्हा कोरड्या जागी ठेवा.
या पावडरने भांडी स्वच्छ केल्यानंतर लख्ख चमकतील व काळपटपणादेखील दूर होईल.