गॅस शेगडीचा वापर दररोज होत असतो. जेवण बनवताना तेलाचे किंवा खरकटे डाग पडतात त्यामुळं गॅस बर्नर व शेगडी खराब होते.
गॅस बर्नरवरील चिकट व हट्टी डाग काढणे खूप कठिण होऊन जाते. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
गॅसची सफाई करताना ग्रेट्स, बर्नर कॅप आणि बर्नर हेड बाजूला काढून ठेवा. त्यानंतर एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ईनो मिसळा.
आता ईनोमध्ये एक मोठा चमचा लिंबाचा रस मिसळा आणि त्यात 15 मिनिटांपर्यंत गॅस बर्नर ठेवून द्या.
यामुळं गॅस बर्नरवरील काळपटपणा थोडाफार साफ झाला असेल. व उरलेला काळपटपणा साफ करण्यासाठी लिक्विड सोपचा वापर करा.
बर्नर साफ करण्यासाठी लिक्विड सोप टुथब्रश टाकून त्याने बर्नर साफ करा. यामुळं काळपटपणा दूर होईल.
त्यानंतर तुमचे गॅस बर्नर सुती कपड्याने सुकवून घ्या या सोप्या टिप्सने तुमचे गॅस बर्नर नव्यासारखे चमकेल