गुळाचा चहा आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. परंतु घरी गुळाचा चहा बनवणं तितकं सोपं नाही.
बऱ्याचदा घरी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. तेव्हा गुळाचा चहा फाटू नये म्हणून काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
गुळाचा चहा बनवताना दूध उकळण्यापूर्वीच जर गूळ किंवा गुळाची पावडर घातली तर चहा फाटतो.
दूध पूर्णपणे उकळले कि मगच त्यात गूळ घालावा. तसेच तुम्ही चहा पूर्ण तयार झाल्यावर सुद्धा त्यात चवीनुसार गूळ टाकू शकता.
गुळाचा चहा करताना नेहमी सेंद्रिय गुळाचा वापर करावा.
पिवळ्या रंगाच्या गुळात अनेकदा सोडा मिसळा जातो आणि या सोड्यामुळे चहा फाटण्याची शक्यता असते.
चहा करताना गूळ हा नेहमी बारीक किसलेला असावा. अन्यथा गुठळ्या असलेला गूळ घातल्यास चहा फाटण्याची शक्यता असते.
गुळाचा चहा बनवल्यावर तो गरमागरम असतानाच प्यावा. नाहीतर जास्त वेळ ठेवल्यास तो खराब होऊ शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)