डोसा तव्यावर घातल्यावर उलथताना तुटतो किंवा तव्याला चिकटतो. अश्यावेळी सगळी मेहनत वाया जाते.
डोसे नीट झाले नाही तर नाश्त्याचा संपूर्ण मूड बिघडतो. म्हणूनच डोश्याचे पीठ आंबवताना काही टिप्स लक्षात ठेवा.
तांदूळ 2 कप, उडीद डाळ-1/2 कप, चण्याची डाळ-2 कप, पोहे-1/4 कप, मेथी दाणे-1 चमचा, मीठ चवीनुसार
तांदूळ घेताना तुम्ही ज्या कपाचे माप घेतले आहे. तितकेच माप घेऊन अर्धा कप डाळ घ्या
मोठ्या भांड्यात डाळ, तांदुळ, मेथी दाणे टाकून तीन ते 4 वेळा धुवून घ्या. त्यानंतर 45 तासांसाठी पाण्यात भिजवा
आता हे डाळ-तांदुळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात थोडे पोहेदेखील टाका
हे मिश्रण वाटत असताना त्यात थोडे पाणीदेखील टाकत जा. मिश्रण बारीक झाल्यानंतर एका भांड्यात काढा
या मिश्रणात चवीनुसार मीठ टाका. यामुळं पीठ आंबण्यास सुरुवात होईल
डोश्याचे पीठ तयार झाल्यानंतर ते गरम ठिकाणी ठेवा जेणेकरुन छान आंबेल
8-9 तासांनंतर पुन्हा एकदा पीठ तपासा. छान फुलल्यानंतरच डोसे काढायला घ्या