कोबीची भाजी खायला मुलं कंटाळा करतात. अशावेळी हा एक पदार्थ त्यांना बनवून द्या
मुलांना कोबीची भाजी बनवून देण्यापेक्षा कोबीचं भानोळं बनवून द्या. मुलं आवडीने खातील
बारीक चिरलेला कोबी, कांदे, बेसन, तांदळाचे पीठ, गुळ, मसाला, हळद,धणे पावडर, हिंग, तेल, मीठ आणि पाणी
बारीक चिरलेल्या कोबीत कांदे, बेसन, तांदळाचे पीठ, गुळ मसाला, हळद, धणे पावडर, हिंग आणि पाणी टाकून मिश्रण एकजीव करुन घ्या
त्यानंतर एका पॅनमध्ये तेल लावून घ्या. त्या हे मिश्रण पसरवून घ्या. आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर शिजत ठेवा
भानोळ्याची एक बाजू शिजल्यानंतर ते केकप्रमाणे ताटात काढा आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने शिजत ठेवा
भानोळे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. दोन्ही बाजू व्यवस्थित शिजल्यानंतर ते खायला घ्या