आषाढ महिन्यात आवर्जून तळणीचे पदार्थ केले जातात.
त्यातीलच एक पारंपारिक पदार्थ म्हणजे तिखट-मीठाच्या पुऱ्या
नेहमीपेक्षा खुशखुशीत पुऱ्यांऐवजी कुरकुरीत या पुऱ्या चहासोबतही खायला करु शकता
गव्हाचे पीठ, बेसन, मोहनासाठी तेल, ओवा, तीळ, तिखट, मीठ, हळद, धणे-जिरे पुड, तळण्यासाठी तेल
गव्हाचे पीठ्यात बेसन, तिखट, हळद, धणेजीरे पूड, ओवा, मीठ, घेऊन त्यात गरम तेलाचे मोहन घालावे
त्यानंतर आता कोमट पाणी घेऊन घट्टसर पीठ मळून घ्यावे व 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा
आता पुऱ्या पातळ लाटून घ्या आणि तेलात तळायला सुरुवात करा
फक्त एक लक्षात घ्या की पुरी तळताना सतत दाबत राहिल्यास ती कडक होते.