कचरा समजून फेकून देता लसणाची सालं? फायदे वाचल्यानंतर साठवून ठेवाल

Pooja Pawar
Jan 30,2025


लसूण जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.


पण तुम्हाला माहितीये का की लसूणचं नाही तर त्याची सालं सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.


लसूणच्या सालींमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि फ्लेवेनोइड्स सारखे पोषकतत्व असतात.


तुम्हाला सर्दी झाली असेल तर लसणाच्या साली पाण्यात उकळवून त्याची चहा बनवून पिऊ शकता.


लसूणच्या सालींमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुण असतात ज्यामुळे सर्दी बरी होते आणि घशाला सुद्धा आराम मिळतो.


पाय दुखत असल्यास तुम्ही कोमट पाण्यात लसूणाची सालं उकळवून त्या पाण्यात थोडा वेळ पाय डुबवून बसल्यास वेदना कमी होतात.


पिंपल्सच्या समस्येवर सुद्धा लसूणच्या सालींचा उपाय खूप फायदेशीर ठरतो. लसणाच्या साली मिक्सरमध्ये वाटून त्यांची पेस्ट करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story