लवकर अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे.
प्रभू श्रीराम आपल्या खास गुणांमुळे मर्यादापुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. प्रत्येक व्यक्ती आपल्याच काही गुणांमुळे आणि कर्मांमुळे ओळखला जातो. आणि यातूनच काही ना काही शिकत असतो.
वाल्मिकी रामायणानुसार, श्रीराम भगवान विष्णूचे 7 अवतार असून ते 12 कलांनी युक्त आहे. श्रीराम सूर्यवंशी असून सूर्याला 12 कला अवगत होत्या.
रामायण आणि रामचरितमानसनुसार, श्रीराम आपल्या वडिलांच्या सांगण्यावरुन राज्य सोडून 14 वर्षे वनवासात गेले.
श्रीराम यांच्याकडील काही गुण प्रत्येक व्यक्तीत असणे गरजेचे आहेत. कथावाचक जया किशोरी यांच्याकडून जाणून घेऊया श्रीरामांचे खास गुण
श्रीरामांचा सहनशीलता हा सर्वात मोठा गुण आहे. अयोध्येचे राजकुमार असूनही श्री राम यांनी 14 वर्षांचा वनवास सहन केला. यामधून त्यांच्या सहनशीलतेचे दर्शन होते.
भगवान राम यांचा स्वभाव अतिशय दयाळू होता. त्यांनी दया करुन सर्वांवर आपली छाया ठेवली होती. त्यांनी प्रत्येकाला पुढे येऊन नेतृत्व करण्याचा अधिकार दिला. सुग्रीवला राज्य करायला देणे हे दयाळू स्वभावाचे प्रतीक होते.
प्रत्येक जातीतील आणि वर्गातील व्यक्तीसोबत प्रभू राम यांचे मैत्रीचे नाते होते. प्रत्येक नात्याला प्रभू श्री राम यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले. सुग्रीव, निषादराज यांच्यामुळे अनेकदा ते संकटातही सापडले.
भगवान राम अतिशय कुशल प्रबंधक होते. ते कायम सगळ्यांना सोबत घेऊन चालत असतं. भगवान रामाच्या नेतृत्व क्षमतेमुळे लंका जाण्यासाठी दगडांचा सेतु तयार करण्यात आला.