ऐन तारुण्यात नव्हे, पण काही सवयी अनेकांनाच त्यांच्या चाळीशीनंतर अडचणीच्या ठरताना दिसतात. अशा परिस्थितीत स्वत:च्या काही सवयींवर ताबा ठेवणं अतिशय गरजेचं.
कोणत्याही व्यक्तीसाठी मद्यपानाची सवय अतिशय वाईट. पण, चाळीशीनंतर ही सवय सोडलेलीच बरी.
चाळीशीनंतर जंक फूड , तेलकट पदार्थ, अतिसाखर असणाऱ्या पदार्थांचं सेवन टाळावं.
शरीराला पुरेशा पाण्याची सवय असते. त्यामुळं चाळीशीनंतर कमी पाणी पिण्याची सवय सोडलेली बरी.
रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याच्या सवयीमुळं झोपेचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळं शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार चाळीशीनंतर शरीर ताणतणाव सहन करण्यायोग्य नसल्यामुळं ताणतणावापासून दूर राहणं उत्तम. चाळीशीनंतर टाळाव्यात अशा आणखी सवयी म्हणजे स्क्रीन टायमिंग, अनियमित दिनचर्या, अतिमेहनतीची कामं.