आता आंब्याचा मोसम सुरू आहे. आंबा हा प्रत्येकालाच आवडतो
आंबा खावून झाल्यानंतर त्याच्या साली फेकून देतात. मात्र, तुम्ही या पद्धतीने त्याचा खत म्हणून वापर करु शकता.
आंब्याच्या सालीत कॉपर, फोलेट आणि जीवनसत्व बी 6 यासारखे गुणधर्म आढळतात. याचा वापर झाडांच्या खतांसाठी होऊ शकतो
आंब्याच्या सालीचे खत तयार करण्यासाठी सर्व प्रथम साली बारीक चिरून घ्या
नंतर एका कढाईत पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यावर त्यात साली टाकून चांगल्या शिजवून घ्या
नंतर, 15 मिनिटांनंतर गॅस बंद करुन घ्या. पाणी थोड थंड झाल्यावर साली एका प्लेटमध्ये काढा
शिजवलेल्या आंब्याच्या साली वाळवण्यासाठी उन्हात ठेवून द्या. वाळवल्यानंतर खत म्हणून त्याचा वापर करा.
झाडांच्या आजूबाजूला हे खत वापरा. झाडांची चांगली वाढ होते.