Friendship Day ला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट, मैत्रीसाठी ठरेल अशुभ

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 02,2024

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.

या दिवशी अनेक मित्र एकमेकांना गिफ्ट देत असतात. पण हे गिफ्ट देताना सावध. कारण...

फ्रेंडशिप डेला तुम्ही गिफ्ट देऊन भावना व्यक्त तर कराल पण यामुळे तुमची मैत्री कायमची तुटेल आणि या गोष्टी तुमच्या नात्याला अशुभ ठरतील.

वास्तुनुसार अशा कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्यातुम्ही कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

परफ्यूम

एक सुगंधीत गोष्ट म्हणून तुम्ही परफ्युम मित्राला गिफ्ट करता. पण यामध्ये नकारात्मक एनर्जी आहे जी शरीरासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे मैत्री तुटू शकते.

काळ्या रंगाची गोष्ट

अनेकदा आपण मित्र परिवाराला गिफ्ट्स देतात. अशावेळी तुम्ही काळ्या रंगाची कोणतीही गोष्ट गिफ्ट म्हणून देऊ नका.

रुमाल

मित्रांना कधीच रुमाल गिफ्ट करु नका. कारण यामुळे तुमची मैत्री फार काळ टिकत नाही. रुमालात नकारात्मकता असते. जी मैत्रीसाठी घातक असते.

शोपीस

शोपीस किंवा पाण्याचे फव्वारे असलेले कोणतेच गिफ्ट मित्र मैत्रिणींना देऊ नका. यामुळे तुमचं नातं कमी काळ टिकेल.

VIEW ALL

Read Next Story