नळाच्या पाण्यात अशुद्ध तत्व आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. ज्यानं बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.
त्याशिवाय नळाचं पाणी घातल्यानं त्याची काम करण्याची स्पिड किंवा मग क्षमता ही कमी होऊ शकते त्याशिवाय तो फूटू देखील शकतो.
आता तुम्हाला प्रश्न असेल की मग कोणतं पाणी घालतात तर त्याचं उत्तर आहे डिस्टिल्ड वॉटर.
डिस्टिल पाण्यात अशुद्ध तत्व आणि खनिजं नसतात. त्यामुळे बॅटरी चांगली राहते.
चुकून नळाचं पाणी तुम्ही इन्वर्टरमध्ये घातलंत तर लगेच बॅटरीतून ते पाणी काढा.
बॅटरीला उलटं करून तुम्ही हे पाणी काढू शकतात.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)