कुटुंबात मोठी सून असणे ही खूप मोठी जबाबदारी असते. तिच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात.
कुटुंबाचा मान-सन्मान राखला जाईल हे नेहमी मोठ्या सूनेला बघाव लागत.
घरातील अनेक कामांची जबाबदारी मोठ्या सूनेकडेच असते.
स्वतःसाठी फारच कमी वेळ त्यांच्याकडे असतो.
कुटुंबात जेव्हा तणाव आणि अडचणी येतात त्यावेळेस मोठ्या सुनेला धैर्य आणि सहनशीलता दाखवावी लागते.
घरातला व्यवहार देखील व्यवस्थित सांभळावा लागतो.
घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे ही जबाबदारी मोठ्या सूनेची असते.
वडीलधाऱ्या माणसांनतर मोठी सून ही घरातली कर्ती स्त्री असते, त्यामुळे तिने घरातल्या माणसांना जोडून ठेवल पाहिजे.