चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण ड्राय-फ्रुट्स किंवा फळे नेहमीच खातो.
हे पदार्थ आरोग्यासाठी योग्य आहेत. पण, काही असे धान्य आहेत जे खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
अनेकांना या विषयी माहितीच नसते. राजगिऱ्यामध्ये व्हिटामिन बी आणि सी मोठ्या प्रमाणात आढळते. त्याशिवाय मॅग्नेशिअमदेखील जास्त असते.
100 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये 350 मिलिग्रॅम कॅलोरी असतात. हे वजन नियंत्रित करण्यासाठीसुद्धा मदतरुप ठरते.
विशेषतः हा एकच असा सुपरफूड आहे ज्यामध्ये 9 प्रकारचे अमीनो आम्ल आढळतात.
राजगिऱ्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. जसे की शिरा, लाडु, पराठे, खिचडी असे पदार्थ तयार करा आणि खा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)