सासु आणि जावयाचं नातं खूप खास असतं. पण तरीही सासूने जावयाला काही गोष्टी सांगू नये.
जावयाची नोकरी किंवा पगाराबद्दल काही बोलायला जाऊ नये. त्याचा आत्मविश्वास कमी होईल असे शब्द वापरु नये.
जावयाची तुलना इतरांशी करु नका यामुळे त्याची स्वाभीमान दुखावू शकतो.
मुलगी आणि जावयाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करु नये. अशाने त्यांचं नातं तुटू शकतं.
जावयाची कोणती गोष्ट आवडली नसेल तर न भडकता प्रेमाने सांगायला हवी.
जावयाला आपल्या मुलीशी संबंधित सिक्रेट गोष्टी सांगू नये. यामुळे नात्यातील तमाव वाढेल.
दुसऱ्या परिवारासमोर जावयाला अपमानित करु नका.
जावयाला न मागता सल्ला देण्याची चूक करु नका. अशाने त्याला वाईट वाटू शकते.
नातवाच्या भविष्याबद्दल जावयावर टाकू नये. प्रत्येकाने आपल्या मुलाचा विचार केलेला असतो.
जावयाकडे मुलीबद्दल वाईट बोलू नये. यामुळे दोघांमध्ये भांडणं होऊ शकते.