उन्हाळ्यात माठातील पाणी पिणाऱ्यांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळतं. केवळ थंड पाणी म्हणून नाही तर माठातील पाणी हे आरोग्यासाठीही फायद्याचं असतं. कसं ते पाहूयात..
नैसर्गिक मातीपासून बनवलेल्या माठात साठवलेलं पाणी हे भांड्यात साठवलेल्या पाण्यापेक्षा अधिक आरोग्यदायी असण्याचं कारण म्हणजे माठ बनवण्यासाठी वापरलेल्या मातीमधील खनिजे यात मिसळलेली असतात. मातीचे गुणधर्म पाण्यात मिसळतात.
माठातील पाणी प्यायल्याने अन्न पचनक्रिया म्हणजेच मेटाबायोलिझम सुधारते.
अल्कलाइन वॉटर किंवा ज्याला ब्लॅक वॉटर म्हणतात त्याचा नैसर्गिक स्रोत म्हणजे माठातलं पाणी. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉलने ग्रस्त असलेल्यांनी हे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये बीपीए नावाचं रसायन असतं. त्यामुळे तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्याऐवजी माठातलं पाणी प्यायल्यास कोणतंही रसायन तुमच्या पोटात जात नाही.
उन्हाळ्याचा त्रास होत असताना अनेक रसायनयुक्त पदार्थांमुळे शरीराला त्रास होतो. त्यामुळेच अशावेळी माठातील पाणी पिणे अधिक फायद्याचं असतं.
ऋतू बदलताना सामान्यपणे जवळपास सर्वांनाच सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासारखा त्रास होतो. यावरही माठातील पाणी रामबाण पर्याय ठरु शकतं.
Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.