नात्यात येणं सोपं असते पण त्यात टिकून राहणं हे आजच्या जोडप्यांसाठी मोठं आव्हान बनलं आहे.
कालांतराने मतभेदाचे रुपांतर मोठ्या भांडणात होते आणि काही वेळातच ब्रेकअपची परिस्थिती निर्माण होते. हे होऊ नये यासाठी काय करावे हे जाणून घ्या.
तुमच्या जोडीदाराची दुसऱ्याशी तुलना केल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो.
अनेक जोडप्यांमध्ये भांडण होण्याची कारण म्हणजे दोघांपैकी एक आपली चूक मान्य करायला तयार होत नाही. तुम्हीही नेहमी दुसऱ्यांना दोष देत असाल तर लक्षात ठेवा तुमची ही सवय केवळ नात्यासाठीच नाही तर कोणत्याही नात्यासाठी चांगली नाही.
समजा तुमचा पार्टनर तुम्हाला वेळ देत नाहीये किंवा काही प्रॉब्लेम आहे तर याबद्दल गप्प न बसता तुम्ही तुमच्या पार्टनरची मोकळेपणाने बोला.
आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करणे ही कोणत्याही नात्यातील सर्वात मोठी चूक आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल राग आला असेल किंवा संभाषण टाळायचे असेल, दुर्लक्ष करणे हा समस्येवरचा उपाय नाही.
आपण कोणत्याही व्यक्तीकडून जितके देऊ शकतो तितकेच मिळवण्याची अपेक्षा केली पाहिजे. आपण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नये ज्या ते पूर्ण करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपल्या इच्छा इतरांवर लादतो, तेव्हा नात्यात तणाव निर्माण होतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)