हल्ली प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार दारु पितो. अनेक लोक दारूबरोबरच काहीतरी खातात.
पण तुम्हाला माहित आहे का, दारु प्यायल्यानंतर असे काही खाद्यपदार्थ आहेत. जे खाण्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
दारु पिताना काजू, शेंगदाणे खाणं टाळा. यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
तुम्ही दारुमध्ये सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स मिसळून पित असाल, तर ते तुमच्यासाठी घातक ठरु शकते. त्याऐवजी तुम्ही पाणी किंवा बर्फ मिसळून दारुचे सेवन करु शकता.
मद्यपान करताना तळलेले किंवा कुरकुरीत पदार्थ खाणे टाळा. यामुळे तुमची पचनशक्ती कमी होते.
दारु प्यायल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नका. त्यामुळे तुम्हाला जास्त नशा होऊ शकते.
दारु पिताना किंवा त्यानंतर मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे तुम्हाला अॅसिडिटी होऊ शकते.
दारु पिताना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. त्यामुळे शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढते आणि अपचनाचा त्रास होतो.