तुळस ही एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदात सर्व आजारावर त्याचा उपयोग होतो. हिवाळ्यात तुळशीच पानं चहा, दुध घालून घेतलं जातं. पण काही लोकांसाठी तुळशीचं पान खाणं आरोग्यासाठी घातक ठरतात.
तुळस किंवा तुळशीचा प्रकार बेझील ही एक सुगंधित औषधी वनस्पती असून ही पुदीना वनस्पतींच्या लॅमिआसी प्रकाराची आहे. टीओआयच्या अहवालानुसार गर्भवती महिलेने तुळशीचं सेवन केल्यास गर्भाशयाच्या आकुंचनास कारणीभूत ठरु शकतं.
अनेक अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, तुळशीचं पान हे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. पण जर कोणी आधीच यासंदर्भात औषधोपचार करीत असेल तर त्या व्यक्तीने तुळसीचं सेवन टाळावं. अहवालानुसार, साखरेची पातळी खूप कमी होते.
जे लोक आधीपासून अँटी क्लॉटिंग औषधं घेतात त्यांनी तुळस खाणं टाळावं.
तुळशीमध्ये भरपूर युजेनॉल असतात. त्यामुळे युजेनॉलचे जास्त सेवन केल्याने यकृताचं नुकसान होण्याची भीती असते. तसंच मळमळ आणि जुलाबाची समस्या होते.
शास्त्रीयनुसार तुळशीमधील मर्क्युरी असते त्यामुळे तुळशीची पानं कधीही चघळू नये. त्याशिवाय तुळश ही अम्लीय असते. आपले तोंड अल्कलाईन होतं. त्यामुळे आपले दात खराब होऊ शकतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)