'या' गोष्टी सांगतात तुमचा जोडीदार दुसऱ्यावर प्रेम करतो
कोणत्याही नात्यात प्रेमासोबत विश्वासही महत्त्वाचा आहे. अनेक वेळाला आपला जोडीदार आपली फसवणूक करतोय हे आपल्याला कळतं नाही. अशावेळी त्याचा या 8 गोष्टींचे दुर्लक्ष करु नका. कदाचित तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये गुंतलेला असेल.
अशी व्यक्ती त्यांचा फोन लॉक ठेवतात. शिवाय त्याचा पासवर्ड ते जोडीदारालाही देत नाही. सिरियर चीटर अनेकदा त्यांचे फोन किंवा मेसेज लपवतात. त्यांचे अनेक संवाद, माहिती ते अगदी खाजगी ठेवतात.
प्रत्येक रोमँटिक नातेसंबंध हे बांधिकलीने सुरु होतं. विश्वास आणि प्रेम यावर तुमचं नातं अधिक मजबूत होतं. पण सीरियल चीटर्स नात्यामध्ये कुठल्याही प्रकारची बांधिलकी दाखवत नाहीत.
या व्यक्ती इतरांशी वारंवार फ्लर्टिंग करतात. इतरांशी अधिक जवळीक आणि मैत्रीपूर्ण नातं बनवण्यासाठी कायम पुढे असतात.
लैगिंक संबंध असो किंवा रोमँटिक नातं त्यात भावनिक जवळीक महत्त्वाची असते. पण सीरियर चीटर व्यक्तीमध्ये भावनिक नात्यात जाणवत नाही. तो भावनांपासून कायम अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो.
ही लोक इतरांकडून लक्ष आणि प्रशंसा शोधत असतात. या लोकांना validation ची सतत गरज भासते.
हो, अनेक जोडीदारांना त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलणे आवडतं नाही किंवा ते भूतकाळ लपवून ठेवतात. कारण तुमच्या पूर्वी त्यांनी अनेक नात्यात फसवणूक केली असू शकतं.
फसवणूक करणारी व्यक्ती वारंवार खोटं बोलतात. त्याच्या अनेक कृतींबद्दल त्यांच्याकडे पटेल असं उत्तर नसतं.
तुम्ही एखाद्या सीरियल चीटरला डेट करत असाल तर, जेव्हा तुम्ही त्यांना निष्ठेबद्दल प्रश्न करता तेव्हा ते बचावात्मक किंवा टाळाटाळ करू शकतात, असं डॉ तनेजा सांगतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)