चिम्पॅन्जी साधारणपणे झाडं, पाला-पाचोळा खातात. पण गरज भासल्यास ते त्यांच्या मुलांना देखील खाऊ शकतात.
क्रॅब स्पायडरमध्ये हे उलटं होतं. मुलांना भूक लागल्या फीमेल क्रॅब स्पायडर स्वत: चं शरीर त्यांच्या मुलांना खाऊ घालतात.
पानघोडा शाकाहारी असतात. मात्र, अनेक संशोधकांना असे वाटते की खूप गरज भासल्यास ते मोठ्या पानघोड्याच्या शरीराचे सेवन करु शकतात.
फीमेल प्रेइंग मेंटिस ब्रीडिंगच्या काही काळानंतर मेल मेंटिसला खातात. सुरुवातीला डोकं आणि मग त्याचं संपूर्ण शरीर.
पोलर बीयरला जर भूक लागली आणि खायला काही नसेल तर ते त्यांच्या मुलांना खाऊ शकतात.
हॅम्सटर हे नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या मुलांना खाऊ शकतात.
सिंह मोठ्या प्रमाणात इतर प्राण्यांचे शिकार करतात. पण कधी-कधी ते त्यांच्या मुलांना देखील खाऊ शकतात.