थायलँड, मालदीव नाही; तर 'हा' देश आहे, भारतीयांचे आवडते डेस्टिनेशन

Jan 16,2025


सुट्ट्यांमध्ये लोक आपला मित्रपरिवार किंवा कुटुंबासोबत आवडत्या ठिकाणी फिरायला जाणं पसंत करतात. आता फक्त भारतातच नव्हे तर जगभरात भारतीय लोक फिरण्यासाठी जात असतात.


मालदीव, थायलँड ही ठिकाणे तर लोकांच्या आवडीची आहेतच, पण याशिवाय सुद्धा असा एक देश आहे जो पर्यटन स्थळ म्हणून भारतीयांच्या पसंतीस उतरला आहे.


भारतातील पर्यटक युरेशियन देश अजरबैजानला फिरायला जाणं अधिक पसंत करतात. या देशात भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी जात असतात.


अजरबैजान हा कॅस्पियन महासागर आणि काकेशस डोंगरांनी वेढलेला अतिशय सुंदर देश आहे.


अजरबैजान देशाची लोकसंख्या केवळ 1.1 कोटी असून 'बाकू' ही त्याची राजधानी आहे.


परदेशी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी अजरबैजान हा त्यांच्या आवडत्या देशांपैकी एक आहे. तिथल्या नाईटलाइट्स पर्यटकांना खूपच आकर्षित करतात.


सुंदर असण्यासोबतच हा देश पर्यटकांसाठी आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. याच कारणामुळे पर्यटक अधिक संख्येने या देशात फिरण्यासाठी येत असतात.


या देशात फक्त 1500 रुपयांमध्ये हॉटेलवर थांबण्यासाठी रुम्स उपलब्ध असतात.


या देशात व्हिसा मिळवण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया असते. व्हिसा साठी अप्लाय केल्यानंतर केवळ तीन दिवसाच्या आत तुम्हाला ई-व्हिसा मिळतो.

VIEW ALL

Read Next Story