भारतात रेल्वेचं जाळ खूप मोठं असून जवळपास प्रत्येक लहान मोठ्या शहरांमध्ये रेल्वे स्थानक आहेत.
पण तुम्हाला अशा रेल्वे स्थानकाबद्दल माहितीये का? ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा भाग गुजरातमध्ये आहे.
तुम्हाला माहित असेल तर आज आम्ही याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
हे रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे झोनमध्ये येते.
या रेल्वे स्थानकाच नाव 'नवापूर' असं असून हे स्थानक सुरत आणि भुसावळ मार्गावर आहे.
नवापूर हे रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग हा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात तर अर्धा भाग हा गुजरातच्या तापी जिल्ह्यात आहे.
800 मीटर लांब असलेले ही रेल्वे स्थानक 500 मीटर गुजरातमध्ये तर 300 मीटर महाराष्ट्रात आहे.
याकारणामुळेच या स्थानकावर प्रवाशांकरता होणारी घोषणा ही मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत होते.
नवापूर रेल्वे स्थानकाचे तिकीटघर आणि पोलीस चौकी महाराष्ट्रात तर स्टेशन मास्टरचं ऑफिस गुजरातमध्ये आहे.