आजकाल जवळपास प्रत्येक तरुण मुलीचा आकर्षक दिसण्याकडे कल असतो आणि म्हणून ती मेकअपचा वापर करत असते.
मेकअप करतेवेळी तो व्यवस्थित ब्लेंड होण्यासाठी ब्यूटी ब्लेंडरचा वापर केला जातो.
ब्यूटी ब्लेंडरच्या रोजच्या वापरामुळे तो घाण होतो आणि अशा ब्लेंडरचा वापर चेहऱ्यावरील पिंपल्सना कारणीभूत ठरु शकतात.
जाणून घ्या, महिलांच्या नियमित वापरातलं ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ ठेवण्यासाठी काही टीप्स.
गरम पाण्यात हँडवॉश मिसळून घाण झालेले ब्यूटी ब्लेंडर त्यात टाका आणि त्या पाण्याने ब्लेंडर स्वच्छ धुवून घ्या.
ब्लेंडरला ऑलिव्ह ऑइल लावून आपल्या हाताने ब्लेंडर घासल्याने त्यावर जमलेली घाण साफ होते.
गरम पाण्यात बेकिंग पावडर आणि लिंबाचा रस मिसळूलेल्या मिश्रणात घाण झालेला ब्लेंडर अर्धा तास ठेवा. नंतर त्या ब्लेंडरला गरम पाण्याने धुवून घ्या.
ब्यूटी ब्लेंडर नियमितपणे स्वच्छ ठेवल्याने चेहऱ्यावरील घाण ब्लेंडरमुळे होणारे पिंपल्स तसेच व्हाईटनेसची समस्या दूर होते.