रतन टाटा यांच्या सामाजिक कार्याने आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळते. शिक्षण, आरोग्य, डेव्हलपमेंट या क्षेत्रात त्यांनी सकारात्मक परिवर्तन आले आहे. आज रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्या.
लोखंडाला गंज लागल्यानंतर ते खराब होतं त्या व्यतिरिक्त लोखंडाला कोणी नष्ट करु शकत नाही. त्याप्रमाणेच व्यक्तीच्या चुकीच्या मानसिकतेव्यतिरिक्त स्वतःचे कोणी नुकसान करु शकत नाही.
जीवनात येणारे चढ-उतार हे आयुष्यात पुढे जाण्यास आणि यश मिळवण्यात प्रेरणा देतात.
अपयश आल्यानंतर कधीच घाबरू नका, आयुष्यात यश मिळवण्याचा व पुढे जाण्याचा हा बेस्ट उपाय आहे.
गोष्टी नशीबावर सोडणे यावर मी विश्वास ठेवत नाही. मी कठोर मेहनत आणि कष्ट यावर विश्वास ठेवतो.
सगळ्यात चांगले नेते ते असतात जे त्यांच्या आसपास सहाय्यक आणि सहकारी म्हणून चांगल्या लोकांची पारख करतात.
जेव्हा तुम्ही एका स्वप्नाच्या दिशेने काम सुरू करतात तेव्हा ते पूर्ण मेहनतीने करा. यश तुम्हालाच मिळेल.
यशाची नशा कधीच डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयशाला कधीच हिंमत तोडू देऊ नका
आयुष्य स्वतःला शोधण्यासाठी नाहीये तर स्वतःला कणखर बनवण्यासाठी आणि स्वतःची ग्रोथ करण्यासाठी आहे.