भारतीयांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कमी अंतराचा प्रवास कराव्या लागणाऱ्या आणि परवडणाऱ्या ठिकाणांना सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसत आहे.
व्हीएतनाममधील 'डा नाग' या शहराला भारतीयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. 'डा नाग' शहराबद्दल शोधणाऱ्यांचं प्रमाण तब्बल 1141 % इतकं आहे. या शहराला लागून असलेला समुद्र किनारा जगप्रसिध्द आहे.
भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कझाकिस्तानमधील अल्माटी शहर आहे. डोंगरात वसलेलं अल्माटी शहर फारच सुंदर आहे. या शहरास फिरण्यासंदर्भात सर्च करणाऱ्यांची टक्केवारी 501% इतकी आहे.
अझरबैजानमधील बाकू फिरण्यासाठीही भारतीय उत्सुक दिसून आले. हे शहर यादीत तिसऱ्या स्थानी आहे. या शहरासंदर्भात सर्च करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण 438 % इतकं आहे. बाकूमध्ये अनेक ऐतहासिक इमारती आहे. या इमारतींमुळे बाकू शहराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत सामावेश करण्यात आला आहे. या इमारती पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या शहराला भेट देतात.
जपानमधील ओसाका शहर भारतीयांनी भटकंतीसाठी सर्च केलेल्या शहरांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. या शहराबद्दल 435 % भारतीयांनी सर्च केलं आहे. ओसाका शहर जपान देशाचं सांस्कृतिक केंद्र आहे. या शहरात अत्यंत जुने बौध्द विहार आहेत. हे विहार पाहण्यासाठी जगभरातून लोक इथं येतात.
व्हिएतनाम देशाची राजधानी असलेली हनोई शहर हे जगातल्या जुन्या शहरांपैकी एक आहे. हनोई शहरातील अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. या शहरामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यासंर्भात भटकंतीच्या दृष्टीने तब्बल 396 % भारतीयांनी सर्च केलं आहे.