बऱ्याचवेळा प्रवासात किंवा बाहेर जाताना आपण पाणी किंवा चहा पिण्यासाठी कागदाचे किंवा प्लास्टिकचे कप वापरतो. प्लास्टिकचा कप आरोग्यासाठी चांगला नसतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे पण कागदाचे कपसुद्धा आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्हाला माहित आहे का ?
एका निरीक्षणानुसार कागदापासून बनवलेले कप वापरल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.एवढेच नव्हे तर कागदापासून बनवलेले कप माती आणि निसर्गास हानिकारक असतात असेही म्हटले जाते.
डॉक्टरांच्या मते डिस्पोजेबल कपमध्ये बिस्फेनॉल आणि बीपीए रसायने मोठ्या प्रमाणात असतात.
जेव्हा या कपामधून गरम पाणी किंवा गरम चहा पिला जातो त्यावेळी त्यातील सर्व रसायने विरघळून जातात. या प्रक्रियेत रसायने पोटात गेल्याने कर्करोगाचा धोका उद्भवतो.
त्याबरोबर डिस्पोजेबल कप बनवण्यासाठी मायक्रोप्लास्टिकचा वापर केला जातो.मायक्रोप्लास्टिक्स आणि रसायनांमुळे थायरॉईड रोगाचा धोका वाढतो.जास्त वर्ष वापरल्याने कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो.
यामुळे डिस्पोजल कपमध्ये गरम पाणी किंवा चहा कधीही पिऊ नये, यामुळे शरीराला खूप नुकसान ठरते. लोकांच्या मते पेपर कपमध्ये कोणतेही नुकसान नाही परंतु ते तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले बीपीए रसायन धोकादायक आहे.
तर या कपाचा वापर न करता स्टील किंवा मातीचे कप वापरावेत. मातीच्या कपामध्ये चहा पिणे हाडांसाठी फायदेशीर आहे.