धार्मिक ग्रंथांनुसार, ब्रह्ममुहूर्त म्हणजे देव पृथ्वीवर येतात आणि त्या वेळी सर्व धार्मिक स्थळांचे दरवाजे उघडले जातात.
ब्रह्म मुहूर्त हा मध्यरात्री पहाटे 4 ते 5.30 वाजेपर्यंतचा म्हणजेच 1.30 तासाचा काळ असतो. ज्यामध्ये असुरी शक्तींचा प्रभाव कमी असतो. हा काळ देवाचा मानला जातो.
धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्म मुहूर्तावर देव पृथ्वीवर येतात आणि यावेळी सर्व धार्मिक स्थळांचे दरवाजे उघडले जातात. यावेळी देवांची आंघोळ करून त्यांची पूजा करून प्रतिष्ठापना केली जाते.
ब्रह्म मुहूर्तावर जागरण केल्यानं शरीर निरोगी राहते आणि रात्रीच्या अंधारातून मिळालेल्या ऊर्जेमुळे रोगांपासून बचाव होतो.
या काळात सत्वगुणाचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे मानसिक शांती राहते आणि वाईट विचारांची निर्मिती कमी होते.
ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानं ऊर्जेचा संचार होतो, ज्यामुळे शरीर मजबूत राहते. आपल्याला फ्रेश वाटते आणि त्यासोबत आपण उत्साही राहते.
ब्रह्म मुहूर्तावर अंघोळ केल्याने शरीराला प्रकृतीशी संबंधित फायदे मिळतात.
या काळात, ध्यान आणि आत्म्याशी संबंध टिकवून ठेवल्याने मानवी जीवनात आराम आणि उत्साह प्राप्त होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)