बाथरूम आणि वॉशरूम हे शब्द तुम्ही दिवसभरात अनेकदा वापरत असाल.
तेव्हा बाथरूम आणि वॉशरूम या दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो याविषयी जाणून घेऊयात.
बाथरूम आणि वॉशरूम हे दोन्ही शब्द फ्रान्स भाषेतून घेण्यात आले आहेत.
बाथरूम हे असे ठिकाण आहे जिथे फक्त आंघोळ करण्याची सुविधा असते.
काही ठिकाणी कॉमन बाथरूम असल्याने अशा ठिकाणी टॉयलेट सुद्धा असते. पण त्या ठिकाणाचा मुख्य उद्देश हा आंघोळ करणं असतं.
बाथरूम या शब्द 1780 पासून अमेरिकेत वापरला जाऊ लागला.
वॉशरूम या शब्दाचा उपयोग हा शौचालय सुविधांसाठी केला जातो. जिथे सिंक आणि टॉयलेट सीट असते.
वॉशरूममध्ये आंघोळ करण्याची सुविधा नसते. ऑफिस, मॉल, रेस्टोरंट सारख्या ठिकाणी वॉशरूम असते बाथरूम नाही.
बाथरूम आणि वॉशरूम यांच्यातील मुख्य फरक हा त्यांचा वापर आणि असलेल्या सुविधांमध्ये आहे.