उन्हाळ्यात फ्रीजचं सेटिंग आणि तापमान किती असावं?
सहसा फ्रीज दररोजच वापरात येत असतो. पण, उन्हाळ्यात तो बराच फायद्याचा ठरतो. अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीज फायद्याचा ठरतो.
अनेकदा फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थही खराब होतात. यामागचं कारण म्हणजे तुमच्या फ्रीजचं तापमान.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही फ्रीजचं तापमान मीडियम टेम्परेचर मोडवर ठेऊ शकता. हा आकडा 4 - 5 दरम्यान असू शकतो.
काही फ्रीजमध्ये समर मोड अॅक्टीव्ह करता येतो. त्यामुळं उन्हाळ्यात हासुद्धा एक पर्याय फायद्याचा ठरतो.
समर मोडमध्ये फ्रीजमधील वस्तू कमी वेळात थंड होतात. पण, कायमस्वरुपी हाच मोड सुरु ठेवल्यास मात्र वीजेचा जास्त खप होतो.
हल्ली मात्र अनेक कंपन्यांनी कमी वीजेच्या वापरात समर मोडवर उत्तमरित्या काम करणारे फ्रीजही तयार केले आहेत. त्यामुळं ही बाब तुम्हीह लक्षात ठेवा.