पालक आणि मुल यांच्यातील नातं अतिशय खास असतं.. या नात्यात एक वेगळाच गोडवा असतो.
पण पालकत्वामध्ये मुलांच संगोपन करत असताना पालकांना अतिशय सावधपणे वागावे लागतं.
मुलं लहान असताना पालकांसोबत झोपतात. मात्र हे कोणत्या वयापर्यंत करायला हवं.
कोणत्या वयानंतर मुलं पालकांसोबत झोपली तर त्याचे दुष्परिणाम होतात, ते कोणते?
मुलांना 5 ते 6 वर्षांनंतर वेगळं झोपवायला सुरूवात करायला काहीच हरकत नाही. अनेक मुलांना त्यांच्या शरीरात होणारा बदल कळत नाही पण ते लाजता
NCBI ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मुलं पालकांसोबत झोपली तर त्यांना थकवा, अशक्तपणा, लठ्ठपणा, डिप्रेशन यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
यानंतर मुलं वयात यायला सुरूवात होते. यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक विशिष्ट अंतर निर्माण होते. असं असताना त्यांचे मानसिक आरोग्य सांभाळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.
प्री-प्युबर्टी अगोदरच म्हणजे मुली 8 ते 13 वयापर्यंत वयात येतात तर मुलं 9 ते 14 या वयापर्यंत मोठे होतात. तर या अगोदरच तुम्ही मुलांना वेगळं झोपायची सवय लावली तर नक्कीच फायदा होतो.
पालक हे दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत. यांचा स्वतःचा असा Me Time असायला हवा. जो अनेक पालकांना फक्त झोपताना मिळतो. अशावेळी पालकांची होणारी चर्चा मुलांच्या कानी पडते. हे मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीकोनातून अजिबातच चांगले नाही.