वॉशिंग मशीनमध्ये स्वेटर धुताना 'ही' एक वस्तू नक्की टाका, स्वेटर नव्यासारखे दिसेल
आज कपडे धुण्यासाठी घरा घरामध्ये वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. पण सध्या हिवाळा सुरु असल्याने वूलन कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना तुम्हाला टेन्शन येतं का?
तर आज आम्ही तुम्हाला अशा हॅकचा वापर केल्याने तुमचं लोकरीचे कपडे एकदम नवीन दिसतील.
वेट वाइप्स आज आपण प्रत्येक जण वापरतो. बेबी वाइप आणि मेकअप रिमूवर वाइप्स हे कॉमन आहेत.
तुम्हाला माहिती आहे का, हे वेट वाइप्स तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यास तुमचे कपडे स्वच्छ होण्यास मदत होईल.
कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यास त्यासोबत 2 वेट वाइप्सदेखील टाका. आता नॉर्मल मोडवर वॉशिंग मशीन ऑन करा. यामुळे कपड्यांना चिटकलेले लिंट आणि केस स्वच्छ होण्यास मदत होते.
स्वेटर, जॅकेट आणि वेलवेट सारख्या कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना ही ट्रिक वापरल्यास तुम्हाला फायदा होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा 2 पेक्षा अधिक वेट वाइप्स वापरु नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)