अंडी अनेक पोषकतत्त्वांनी भरपूर असा आरोग्यदायी पदार्थ आहे.
अंड्यांचं सेवन करणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं, असं सांगितलं जातं.
आपल्याकडे सामान्यपणे 7 रुपयाला एक अंड मिळतं. मात्र तुम्हाला माहित आहे का जगात सर्वात महाग अंडी कोणत्या देशात मिळतात?
आपल्या देशात 72 ते 80 रुपयांमध्ये मिळणारी एक डझन अंडी ऑस्ट्रेलियामध्ये 361 रुपयांना मिळतात.
नेदरलँडमध्ये याच एक डझन अंड्यांची किंमत 382 रुपये इतकी आहे.
डेनमार्क हा महागड्या अंड्यांच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इथे 396 रुपयांना 12 अंडी मिळतात.
जगातील सर्वात महाग अंडी मिळणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचे नाव आहे. या देशात 538 रुपयांची 12 अंडी मिळतात.
जगात सर्वात महाग अंडी स्वित्झर्लंडमध्ये मिळतात. या देशात 583 रुपयांना 12 अंडी मिळतात.
म्हणजेच स्वित्झर्लंडमधील लोकांना एका अंड्यासाठी तब्बल 48 रुपये मोजावे लागतात. इतक्यात आपल्याकडे भारतात अर्धा डझन अंडी मिळतात.