डायबेटिज ही सध्या आरोग्याशी निगडित एक वाढती समस्या असून डायबेरीज झालेल्या रुग्णांना काहीही खाताना 10 वेळा विचार करावा लागतो.
तेव्हा आज तुम्हाला अशा फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यात साखरेचे प्रमाण कमी असते.
काही वैज्ञानिक रिपोर्टनुसार 100 ग्रॅम टोमॅटो या फळामध्ये 2.6 ग्रॅम साखर आणि 3.9 ग्रॅम कार्ब्स असतात.
100 ग्रॅम कलिंगडमध्ये 6 ग्रॅम साखर आणि 7.5 ग्रॅम कार्ब्स असतात.
100 ग्रॅम खरबूजमध्ये 8 ग्रॅम साखर आणि 8 ग्रॅम कार्ब्स असतात.
100 ग्रॅम पिचमध्ये 8 ग्रॅम साखर आणि 10 ग्रॅम कार्ब्स असतात.
100 ग्रॅम स्ट्रॉबेरीमध्ये 4.9 ग्रॅम साखर आणि 8 ग्रॅम कार्ब्स असतात.
100 ग्रॅम एवोकाडोमध्ये 0.7 ग्रॅम साखर आणि 9 ग्रॅम कार्ब्स असतात.
100 ग्रॅम अननसमध्ये 10 ग्रॅम साखर आणि 11 ग्रॅम कार्ब्स असतात.
100 ग्रॅम ड्रॅगन फ्रुटमध्ये 7.6 ग्रॅम साखर आणि 13 ग्रॅम कार्ब्स असतात.
100 ग्रॅम ड्रॅगन फ्रुटमध्ये 4.4 ग्रॅम साखर आणि 12 ग्रॅम कार्ब्स असतात.
संबंधित फळांमध्ये साखर इतर फळांच्या तुलनेत कमी असली तरी देखील डायबेटिजच्या रुग्णांनी या फळांचे सेवन करताना डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)