व्हिस्की पिणारे ती किती जुनी आहे याकडे विशेष लक्ष देत असतात. यामुळेच प्रत्येक बाटलीवर तिचं वय म्हणजेच ती किती वर्षं बॅरलमध्ये ठेवली होती हे लिहिलेलं असतं.
व्हिस्कच्या बाटलीवर लिहिलेल्या 10,12 आणि 22 Years यांचा नेमका काय अर्थ असतो आणि किती वर्ष जुनी व्हिस्की चांगली असते हे जाणून घ्या.
GQIndia नुसार, स्पिरीटला व्हिस्की बनवण्यासाठी तिला लाकडाच्या कंटेनरमध्ये ठेवलं जातं. बॅरलमध्ये व्हिस्कीचं वय वाढल्यास तिची चव आणि अफेंट यात फार बदल होतो.
व्हिस्कीचं वय जितकं जास्त असेल तितकी तिची किंमतही जास्त असते. व्हिस्की जेव्हा बॅरलमधून बाहेर काढून बाटलीत भरली जाते तेव्हा तिची एजिंग प्रोसेस तिथेच थांबते.
तज्ज्ञांनुसार, 12 वर्षं बॅरेलमध्ये ठेवलेली व्हिस्की सर्वात चांगली मानली जाते. पण काहींचं म्हणणं आहे की, 20 ते 22 वर्षं बॅरेलमध्ये ठेवलेली व्हिस्की सर्वोत्तम असते.
तर अमेरिकन व्हिस्कीमध्ये 5 ते 10 वर्षं जुनी व्हिस्की चांगली निवड मानली जाते. स्कॉटलंडची व्हिस्की असेल तर 20 वर्षं जुनी चांगली असते, कारण वातावरणात तिची चव बदलत जाते.