एंटिलाय हे जगातील सर्वात महागड्या अशा साऊथ मुंबईत अल्टामाऊंट रोडवर आहे. हे घर 400000 वर्ग फूट, 570 फूट उंच आणि 27 मजल्यांवर बांधल आहे.
एंटिलायचे नाव 'एंटे-ल्लाह' नावाच्या एका पौराणिक बेटावरुन ठेवण्यात आले आहे. 15 व्या शतकातील पौराणिक बेट म्हणून हे लोकप्रिय आहे. याची वास्तुकला ही सूर्य, कमळ आणि मदर ऑफ पर्लवर आधारित आहे.
एंटिलियामध्ये एकूण 49 बेडरुम आहेत. संपूर्ण घराची देखरेख करण्यासाठी 600 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना भरघोस पगार आहे. यामधील अनेक कर्मचाऱ्यांना 1.5 ते 2 लाख रुपये पगार आहे.
एंटिलियामध्ये 168 कारसाठी पार्किंग, बॉलरुम, 50 सीट्सचा थिएटर, हँगिंग गार्डन, स्विमिंग पूल, स्वास्थ केंद्र, स्पा, मंदिर, सुपर फास्ट लिफ्ट आणि स्नो रुम सारख्या सुविधा आहेत.
'खलीज टाइम्स' च्या रिपोर्टनुसार, एंटीलिया हे जगातील सर्वात महागडं खासगी घर आहे. याची किंमत जवळपास 15,000 कोटी रुपये आहे. 'ग्रीन टावर ऑफ मुंबई' नावाने एँटिलिया ओळखलं जातं.
एँटिलिया 'ग्रीन टावर ऑफ मुंबई' या नावाने देखील ओळखलं जातं. कारण या घरात सर्वात जास्त ऊर्जा सोलर पॅनल रोजी येते. एँटिलियामध्ये 3 हेलीपॅड असून रिक्टर स्केल 8 तीव्रता असलेल्या भूकंपला देखील सहन करु शकतो.