रात्री जेवणानंतर अनेकांना आईस्क्रीम खाण्याची सवय असते.

Feb 07,2024


पण रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.


आयुर्वेदानुसार गरम अन्नानंतर थंड पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे, त्याला विरुद्ध आहार असे म्हणतात.


रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे झोप. आईस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही.


रात्री आईस्क्रीम खाल्ल्यानंतर दात घासले नाहीत तर त्यातील साखर रात्रभर तुमच्या तोंडात राहते. त्यामुळे तुमच्या दातात कॅव्हिटीचा धोका वाढू शकतो.


रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याच्या सवयीमुळे व्यक्तीला कफ वाढण्याची तक्रार होऊ लागते. त्यामुळे खोकल्याचे प्रमाण वाढू शकते.


आईस्क्रीममध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणाचा धोका जाणवतो.


आईस्क्रीम हे फ्रुक्टोजच्या मदतीने गोड केले जाते. संशोधकांच्या मते दररोज फ्रुक्टोजयुक्त पदार्थ खाल्ल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

VIEW ALL

Read Next Story