हिवाळ्याच्या दिवसांत भरपूर एनर्जी देणारे ड्राय फ्रुट्सचे रोज सेवन करण्याचा सल्ला दिला जातो
यात बदाम, मनुके यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते
बदाम आणि मनुक्यात फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आढळले जातात. जे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवते
बदाम आणि मनुक्यांना बनवलेले लाडू पौष्टिक असून दिवसभराची उर्जा देतात.
लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला दोन ते तीन कप बदाम मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर यात मनुके टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
भाजून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर यात वेलची आणि गुळ टाकून पुन्हा एकदा वाटून घ्या.
मिश्रणाची पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. नंतर हाताला थोडे तूप लावून लाडू वळून घ्या