31 मार्च ही तारिख एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची आहे कारण ज्यांचा एफडी करायचा विचार आहे, त्यांच्यासाठी एसबीआय अमृत कलश एफडी ही स्कीम मार्च महिन्यापर्यंत देणार आहे.
एसबीआयनं याविषयी अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे या स्किमचा फायदा घेण्यासाठी 20 दिवसांचा काळ आहे.
या स्कीम अंतर्गत बॅंक 400 दिवसाची एफडी सामान्य ग्राहकांना 7.1 टक्के व्याजावर देत आहे.
जेष्ठ नागरीकांना या स्कीमवर 7.60 टक्के व्याज मिळणार आहे. या स्कीममध्ये ते 2 कोटींपर्यंत गुंतवणूक करु शकतात.
एसबीआयच्या अमृत कलश स्कीमची तारिख याआधी 31 डिसेंबर 2023 होती त्यानंतर ती वाढवून 31 मार्च 2024 करण्यात आली.
बॅंकेत जाऊन तुम्ही हे अकाऊंट सुरु करु शकतात. याशिवाय इंटरनेट बॅंकिंग आणि एसबीआय योमो अॅपच्या मदतीनं बनवू शकतो.
अमृत कलश स्पेशल एफडी स्पेशल व्याजाचा फायदा एक, तीन, सहा आणि वर्षावर मिळतो.