विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला 10 वचनं दिली आहेत.
कोल्हापुरातील जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी या 10 वचनांची घोषणा केली
राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही 2100 रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये.
प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
45 हजार पांदण रस्ते बांधणार.
अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
वीज बिलात ३० टक्के कपात.
शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार.