त्याचा बॉटलग्रीन कलर असतो.
त्याचा सुंगध हा वेगळा असतो.
हापूसची साल पातळ असते.
हापूस कापल्यावर आतून केशरी रंगाचा असतो.
हापूसचा देठ खोल असतो.
कोकणातील अनेक गावांमध्ये हापूस आंबे होतात. पण त्या सगळ्यांच्या चवीमध्ये तसा थोडाफार फरक असतो. मग आता तुम्ही म्हणाल नेमका हापूस आंबा ओळखायचा कसा.
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते आंब्याचे. आंब्याचा राजा म्हणून हापूस आंबा ओळखला जातो. पण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात की खरा हापूस ओळखणं कठीण जातं.