हा किल्ला पर्वताच्या पायथ्यापासून चौरस दिसतो, परंतु त्याची रचना प्रिझमसारखी आहे. याची रचना दोन्ही बाजूंनी ० अंश असून किल्ल्याची तिसरी बाजू 75 अंश आहे. हा किल्ला डोंगरावर 170 मीटर उंचीवर असून एक मीटर रूंद सुमारे 117 पायऱ्याद्वारे आपण या किल्लावर जावू शकतो.
गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्वाचा होता. हा किल्ला 17 भक्कम किल्ल्यांपैकी एक होता
पश्चिम घाटाच्या त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर हरिहर किल्ला आहे. किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाला म्हणजेच 9 व्या 14 व्या शतकात झाला.
या किल्लाला हरिहर किल्ला किंवा हर्षगड असे म्हतले जातो. हा किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला आहे.
हा किल्ला जमिनीवर नाही तर एका सुंदर डोंगराच्या माथ्यावर आहे
या किल्ल्यावर प्रत्येक जण चढाई करू शकत नाही. कारण बर्याच ठिकाणी 90 अंशांपर्यंत चढाई करावी लागते.
हा किल्ला घोटी आणि नाशिक शहर पासून 40 कि.मी. अंतरावर आहे. तर इगतपुरीपासून 48 कि.मी. अंतरावर आहे.
राज्यात ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहर गड, ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याच्या पायऱ्या चढणं अतिशय कठीण आहेत. हेच थ्रील अनुभवण्यासाठी तरूणाई हरिहर गडावर येतात.
हरिहर गड... नाशिक जिल्ह्यातला एक अनवट वाटेवरचा किल्ला.
पहिल्या पावसानंतर अनेक हौशी तरूण तरूणी नाशिकच्या हरिहर गडावर जातात.