Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
यंदाच्या वर्षी दहावीचा एकूण निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालाची टक्केवारी 3.11 टक्क्यांनी घटली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थी बसले होते.
परीक्षेला यंदा बसणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींपैकी 95.87 मुली उत्तीर्ण झाल्या, तर 92.05 मुलं परीक्षा उत्तीर्ण झाली.
राज्यातील एकूण निकालाच मुलींनी यंदाही बाजी मारली असून, मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त असल्याचं जाहीर करण्यात आलं.
2022- 2023 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण विषयांपैकी 25 विषयांच्या निकाल 100 टक्के लागला.
राज्यातून सर्वाधिक निकाल कोकण (98.11 टक्के) विभागाचा लागला, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (92.05 टक्के) लागला.
दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या पुनर्परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण 60.90 टक्के
परीक्षेला खासगी पद्धतीनं बसलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 74.25 टक्के आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचं प्रमाण 92.49 टक्के.